Skip to main content

Posts

Best Selling Wordpress Theme, Socrates (view mobile)

Fast, SEO Friendly Wordpress Theme. Easy Setup And Great Support. Used On Over 200k Sites. Please Do Not Purchase Using Your Own Affiliate Link, Contact Support. BUY NOW

c प्रोग्रॅमिंग, भाग-१

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकायचे म्हटले की सर्वप्रथम c प्रोग्रॅमिंग आले पाहिजे. कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर समजते त्यामुळे  मराठीत  c प्रोग्रॅमिंगविषयी लेख लिहिण्यास सुरुवात करीत आहे.सर्व प्रथम आठवण झाली ती Let us C  या पुस्तकाची. C बरोबर माझी पहिली ओळख झाली ती या पुस्तकानेच. त्याचे c   या अक्षराच्या उच्चारातून ध्वनित होणार्‍या दुसर्‍या अर्थावर आधारलेले शीर्षकच आकर्षक होते.  ‘चला पाहू या’ या नावाने ब्लॉग लिहूनच मीही c प्रोग्रॅमिंग विषयी लेखनास सुरुवात करावी असा मला मोह झाला. पण मी तो आवरला. सर्वजण आधी c प्रोग्रॅमिंग शिकतात. माझ्याबाबतीत मात्र तसे घडले नाही. आधी मी बेसिक (gwbasic) प्रोग्रॅमिंग भाषा शिकलो. ती मला इतकी सोपी वाटली की थोड्याच अवधीत मला बेसिकमध्ये कोणताही प्रोग्रॅम लिहिणे जमू लागले. मात्र असे प्रोग्रॅम चालवून त्याचे उत्तर काढण्यासाठी gwbasic ची गरज भासे. शिवाय ती interpreter पद्धतीने ( प्रत्येक वाक्यागणिक प्रक्रिया करणारी) कार्य करीत असल्याने त्या भाषेला कॉम्प्युटर प्रोग्रॅमरऎवजी वापर करणार्‍यासाठी ती योग्य होती.त्यामान...

c प्रोग्रॅमिंग भाग -२

पहिल्या भागात आपण एक प्रोग्रॅम करून पाहिला. मात्र त्यात आपण लिहिलेलेच वाक्य दाखविण्याचे कार्य होते. अधिक वाक्ये लिहिल्यास ती एकापुढे एक अशी सलग येतात. वेगवेगळ्या ओळीवर येण्यासाठी वाक्याशेवटी \n (म्हणजे न्यू लाईन) चा वापर करावा लागतो. बीजगणितात आपण चल व अचल संख्यांना नावे देऊन गणित सोडवितो, त्याप्रमाणे c प्रोग्रॅममध्येही आपल्याला संख्या ( number) वा अक्षरसमूह (string) यांना नावे देऊन गणिते सोडविता येतात. पूर्णांक संख्येसाठी int तर अपुर्णांकासाठी float यांचा वापर केला जातो. उदा. int width,height,area,perimeter याचा अर्थ वरील सर्व संख्या पूर्णांकात आहेत. तर float x,y याचा अर्थ x आणि y या अपूर्णांकातील ( दशांश चिन्हासहित) संख्या आहेत. स्कीनवर पूर्णांक दाखविण्यासाठी %d तर अपुर्णांक दाखविण्यासाठी %f ही चिन्हे वापरावी लागतात व शेवटी व्हेरिएबलचे नाव लिहावे लागते. आता वरील माहितीचा उपयोग करून तयार केलेला खालील प्रोग्रॅम लिहून उत्तर काढा. #include void main() { int width,height,area,perimeter; width=20; height=30; area=width*height; perimeter= 2*(width+heigh...

वेब मास्टर म्हणजे काय ?

वेबमास्टर म्हटले की आपल्या  डोळ्यापुढे स्पायडरमॅनची प्रतिमा उभी राहते.  आपल्या जादूमय जाळ्याच्या मदतीने  अनेक करामती करताना  आपण सिनेमा व  कॉमिक्समध्ये पाहिलेले असते. मात्र  वेबमास्टर याचा अर्थ  असा स्टंटमॅन होत  नाही. मग वेबमास्टर  म्हणजे काय? वेबमास्टर हा शब्द  जाळे विणणार्‍या  कोळ्यावरून आला आहे.  कोळी ज्याप्रमाणे आपल्या  पोटातील रसापासून सुंदर, नाजुक  पण ताकदवान धागा  तयार करतो व  त्यापासून नयन मनोहर,  एरवी अदृष्य पण  उन्हाच्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे रंग  घेऊन चमकणारे जाळे  तयार करतो. हे  जाळे त्याने अनेक  ठिकाणी पानाफांद्यांना जोडलेले असते. अशा  जाळ्याच्या बाजूला राहून कोळी  आपल्या जाळ्यावर नजर ठेवून  असतो. जाळे तुटले  तर लगेच ते  परत दुरुस्त करतो.  अनवधानाने वा जाळ्याच्या  आभासी रंगांना भुलून  कीटक त्यात अडकले  की कोळी त्यांना  आपल्या धाग्यांनी जखडून टाकतो  व आपले भक्ष  बनवतो. सध्याच्या...

मेंदू आणि संगणक

मेंदू आणि संगणक भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी व अशक्य वाटणारी कामे हे यंत्रमानव अगदी सहजपणे करू शकतात. मात्र काम कोणते करावयाचे याची माहिती यंत्रमानवातील संगणकाला द्यावी लागते. जर यंत्रमानव विचार करू लागला ...

छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. घरोघरी ब्रॉडबँड पोहोचल्यावर आणि मोबाईलवर इंटरनेटसेवा सुरू झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढणार आहे. त्यांच्यावर बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. आपण आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकाल. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्...

मराठीसाठी युनिकोडचा वापर

भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाल्याने आणि शासकीय पातळीवर त्या त्या राज्यातील भारतीय भाषेत व्यवहार सुरू झाल्याने स्थानिक जनतेस सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून मिळणे शक्य झाले. मात्र अखिल भारतीय स्तरावर एक भाषा व एक लिपी नसल्याने माहितीच्या आदानप्रदानात अनेक अडथळे निर्माण झाले . माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्याने छपाई क्षेत्रातही टंकलेखन यंत्राऎवजी संगणकाचा वापर सुरू झाला. अनेक संशोधक व्यक्ती आणि संस्थांनी भारतीय भाषांतील सुबक आणि सुंदर छ्पाईसाठी विविध संगणकीय लिपीसंच ( फॉंट) विकसित केले. जलद गतीने टंक लेखन करता यावे यासाठी विविध प्रकारचे कळफलक यासाठी वापरण्यात आले. मराठी, हिंदी आणि संस्कृत यासाठी एकच देवनागरी लिपीसंच वापरण्यात येऊ लागला. मराठीपुरते बोलायचे तर मोड्युलर इन्फोटेकचे श्रीलिपी, व अंकुर श्रेणीतील फॉंट, सी डॅक चे योगेश, सुरेख हे फॉंट, कृतीदेव, शिवाजी, नटराज, चाणक्य, बोली, मिलेनियम वरूण यासारखे अनेक प्रकारचे फॉंट वापरून संगणकावर मराठी लिहिले जाते. मात्र त्यातील कळफलकाच्...

इंटरनेट

आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे. हे 'इंटरनेट` म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाव्दारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट` इतिहास १९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशिय...