Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

Best Selling Wordpress Theme, Socrates (view mobile)

Fast, SEO Friendly Wordpress Theme. Easy Setup And Great Support. Used On Over 200k Sites. Please Do Not Purchase Using Your Own Affiliate Link, Contact Support. BUY NOW

c प्रोग्रॅमिंग, भाग-१

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकायचे म्हटले की सर्वप्रथम c प्रोग्रॅमिंग आले पाहिजे. कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर समजते त्यामुळे  मराठीत  c प्रोग्रॅमिंगविषयी लेख लिहिण्यास सुरुवात करीत आहे.सर्व प्रथम आठवण झाली ती Let us C  या पुस्तकाची. C बरोबर माझी पहिली ओळख झाली ती या पुस्तकानेच. त्याचे c   या अक्षराच्या उच्चारातून ध्वनित होणार्‍या दुसर्‍या अर्थावर आधारलेले शीर्षकच आकर्षक होते.  ‘चला पाहू या’ या नावाने ब्लॉग लिहूनच मीही c प्रोग्रॅमिंग विषयी लेखनास सुरुवात करावी असा मला मोह झाला. पण मी तो आवरला. सर्वजण आधी c प्रोग्रॅमिंग शिकतात. माझ्याबाबतीत मात्र तसे घडले नाही. आधी मी बेसिक (gwbasic) प्रोग्रॅमिंग भाषा शिकलो. ती मला इतकी सोपी वाटली की थोड्याच अवधीत मला बेसिकमध्ये कोणताही प्रोग्रॅम लिहिणे जमू लागले. मात्र असे प्रोग्रॅम चालवून त्याचे उत्तर काढण्यासाठी gwbasic ची गरज भासे. शिवाय ती interpreter पद्धतीने ( प्रत्येक वाक्यागणिक प्रक्रिया करणारी) कार्य करीत असल्याने त्या भाषेला कॉम्प्युटर प्रोग्रॅमरऎवजी वापर करणार्‍यासाठी ती योग्य होती.त्यामान...

c प्रोग्रॅमिंग भाग -२

पहिल्या भागात आपण एक प्रोग्रॅम करून पाहिला. मात्र त्यात आपण लिहिलेलेच वाक्य दाखविण्याचे कार्य होते. अधिक वाक्ये लिहिल्यास ती एकापुढे एक अशी सलग येतात. वेगवेगळ्या ओळीवर येण्यासाठी वाक्याशेवटी \n (म्हणजे न्यू लाईन) चा वापर करावा लागतो. बीजगणितात आपण चल व अचल संख्यांना नावे देऊन गणित सोडवितो, त्याप्रमाणे c प्रोग्रॅममध्येही आपल्याला संख्या ( number) वा अक्षरसमूह (string) यांना नावे देऊन गणिते सोडविता येतात. पूर्णांक संख्येसाठी int तर अपुर्णांकासाठी float यांचा वापर केला जातो. उदा. int width,height,area,perimeter याचा अर्थ वरील सर्व संख्या पूर्णांकात आहेत. तर float x,y याचा अर्थ x आणि y या अपूर्णांकातील ( दशांश चिन्हासहित) संख्या आहेत. स्कीनवर पूर्णांक दाखविण्यासाठी %d तर अपुर्णांक दाखविण्यासाठी %f ही चिन्हे वापरावी लागतात व शेवटी व्हेरिएबलचे नाव लिहावे लागते. आता वरील माहितीचा उपयोग करून तयार केलेला खालील प्रोग्रॅम लिहून उत्तर काढा. #include void main() { int width,height,area,perimeter; width=20; height=30; area=width*height; perimeter= 2*(width+heigh...

वेब मास्टर म्हणजे काय ?

वेबमास्टर म्हटले की आपल्या  डोळ्यापुढे स्पायडरमॅनची प्रतिमा उभी राहते.  आपल्या जादूमय जाळ्याच्या मदतीने  अनेक करामती करताना  आपण सिनेमा व  कॉमिक्समध्ये पाहिलेले असते. मात्र  वेबमास्टर याचा अर्थ  असा स्टंटमॅन होत  नाही. मग वेबमास्टर  म्हणजे काय? वेबमास्टर हा शब्द  जाळे विणणार्‍या  कोळ्यावरून आला आहे.  कोळी ज्याप्रमाणे आपल्या  पोटातील रसापासून सुंदर, नाजुक  पण ताकदवान धागा  तयार करतो व  त्यापासून नयन मनोहर,  एरवी अदृष्य पण  उन्हाच्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे रंग  घेऊन चमकणारे जाळे  तयार करतो. हे  जाळे त्याने अनेक  ठिकाणी पानाफांद्यांना जोडलेले असते. अशा  जाळ्याच्या बाजूला राहून कोळी  आपल्या जाळ्यावर नजर ठेवून  असतो. जाळे तुटले  तर लगेच ते  परत दुरुस्त करतो.  अनवधानाने वा जाळ्याच्या  आभासी रंगांना भुलून  कीटक त्यात अडकले  की कोळी त्यांना  आपल्या धाग्यांनी जखडून टाकतो  व आपले भक्ष  बनवतो. सध्याच्या...

मेंदू आणि संगणक

मेंदू आणि संगणक भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी व अशक्य वाटणारी कामे हे यंत्रमानव अगदी सहजपणे करू शकतात. मात्र काम कोणते करावयाचे याची माहिती यंत्रमानवातील संगणकाला द्यावी लागते. जर यंत्रमानव विचार करू लागला ...

छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. घरोघरी ब्रॉडबँड पोहोचल्यावर आणि मोबाईलवर इंटरनेटसेवा सुरू झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढणार आहे. त्यांच्यावर बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. आपण आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकाल. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्...

मराठीसाठी युनिकोडचा वापर

भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत. भाषांवर आधारित राज्यांची निर्मिती झाल्याने आणि शासकीय पातळीवर त्या त्या राज्यातील भारतीय भाषेत व्यवहार सुरू झाल्याने स्थानिक जनतेस सर्व माहिती आपल्या मातृभाषेतून मिळणे शक्य झाले. मात्र अखिल भारतीय स्तरावर एक भाषा व एक लिपी नसल्याने माहितीच्या आदानप्रदानात अनेक अडथळे निर्माण झाले . माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाल्याने छपाई क्षेत्रातही टंकलेखन यंत्राऎवजी संगणकाचा वापर सुरू झाला. अनेक संशोधक व्यक्ती आणि संस्थांनी भारतीय भाषांतील सुबक आणि सुंदर छ्पाईसाठी विविध संगणकीय लिपीसंच ( फॉंट) विकसित केले. जलद गतीने टंक लेखन करता यावे यासाठी विविध प्रकारचे कळफलक यासाठी वापरण्यात आले. मराठी, हिंदी आणि संस्कृत यासाठी एकच देवनागरी लिपीसंच वापरण्यात येऊ लागला. मराठीपुरते बोलायचे तर मोड्युलर इन्फोटेकचे श्रीलिपी, व अंकुर श्रेणीतील फॉंट, सी डॅक चे योगेश, सुरेख हे फॉंट, कृतीदेव, शिवाजी, नटराज, चाणक्य, बोली, मिलेनियम वरूण यासारखे अनेक प्रकारचे फॉंट वापरून संगणकावर मराठी लिहिले जाते. मात्र त्यातील कळफलकाच्...

इंटरनेट

आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे. हे 'इंटरनेट` म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाव्दारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट` इतिहास १९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशिय...

आधार काय आहे

आधार काय आहे आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल. क्रमांक एका केंद्रिकृत डेटाबेसमध्ये संचयित केला जाईल आणि मुलभूत जनसांख्‍यिकी आणि बायोमॅट्रिक माहिती - प्रत्येक व्यक्तिचे - छायाचित्र, दहा बोटांचे ठसे आणि नेत्रपटल यांसह दुवा साधला जाईल. डेटा फील्ड आणि पडताळणी प्रक्रिया येथे उपलब्ध आहे आधार हे करेल ऑनलाइन सहजपणे पडताळण्यायोग्य, मूल्य-प्रभावी मार्ग शासकीय आणि खाजगी डेटाबेसमधील मोठ्या संख्‍येतील बनावटी आणि फसव्या ओळखी काढून टाकण्यासाठी अद्वितीय आणि सशक्त जात, पंथ, धर्म आणि भौगोलिक स्थानावर आधारित कोणत्याही वर्गीकरणाव्यतिरीक्त निर्माण केलेला यादृच्छिक क्रमांक.

‘ट्रूकॉलर’वरुन असा हटवा तुमचा मोबाईल नंबर!

ट्रूकॉलर अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये असतं. एखादं अनोळखी मोबाईल नंबर ओळखण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. हे अॅप युजर्सच्या अॅड्रेस बुकना अॅक्सेस करुन सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स तयार करतं. जरी तुम्ही ट्रूकॉलर अॅप कधीही इन्स्टॉल केलं नसेल, मात्र तरीही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ट्रूकॉलरच्या डेटाबेसमध्ये असतो. जर तुम्हाला या ट्रूकॉलर अॅपच्या डेटाबेसमधून तुमचा नंबर हटवायचा असले, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल असेल, तर तुम्ही ट्रूकॉलरमधून तुमचा नंबर डिलिट करु शकत नाही. सर्वात आधी ट्रूकॉलर डिअॅक्टिव्ह करा अँड्रॉईड : अॅपवर क्लिक करा > अॅपमध्ये डाव्या बाजूस पीपुल आयकॉनवर क्लिक करा सेटिंग्ज अबाऊट आयफोन : अॅपवर क्लिक करा > अॅपमध्ये उजव्या बाजूस असलेल्या गियर आयकॉनवर क्लिक करा अबाऊट ट्रूकॉलर त्यानंतर खाली जा आण ट्रूकॉलर डिअॅक्टिव्ह करा विंडोज : अॅपवर क्लिक करा > अॅपमध्ये खालच्या बाजूस उजव्या बाजूला तीन डॉट असलेलं एक आयकॉन असेल, त्यावर क्लिक करा > सेटिंग्ज > हेल्प > ट्रूकॉलर अकाऊंट डिअॅक्टिव्ह करा आता ट्रूकॉल...

पॅटर्न लॉक विसरलात तर?

स्मार्टफोनमध्ये जे काही बिल्टइन सिक्युरिटी फिचर असतात त्यातले सगळ्यात जास्त वापरले जाणारे सिक्युरिटी फिचर म्हणजे पॅटर्न लॉक ! स्मार्टफोन सिक्युरिटीमधला सगळ्यात वरचा लेअर म्हणजे हा ‘पॅटर्न लॉक ’. स्मार्टफोन विकत घेतला रे घेतला की, सगळ्यात आधी लोक हा पॅटर्न लॉक सेट करतात, तो सतत बदलतात. इतरांपेक्षा आपला लॉक वेगळा असावा, म्हणून धडपडतात. पॅटर्न लॉक बदलत राहणं हा अनेकांचा छंदच होऊन बसलेला असतो. हे गाडं तिथवर सुरळीत राहतं, जोवर तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा देत नाही. पण ती कधीतरी दगा देतेच. आणि मग या नात्यामध्ये दरार  पडते. स्वत:च सेट केलेले पॅटर्न काहीजण विसरून जातात मग होते खरी पंचाईत. कारण पॅटर्न लॉक विसरलं तर स्मार्टफोन कसं वापरणार? ते लॉक ‘अनलॉक’ करावं लागतं आणि जिथं ऐनवेळेस आपला नेहमीचा पॅटर्न आठवत नाही, तिथं अनलॉक करायचं कसं आठवावं? पण ते माहिती तर पाहिजे, नाहीतर पॅटर्न लॉक उघडता येत नाही, म्हणून रडत बसायची पाळी येते. तशी तुमच्यावर येऊ नये, म्हणून या काही सोप्या आयडिया लक्षात ठेवा.. पॅटर्न लॉक अनलॉक कसं करतात ? पद्धत -1 गुगलचं युजरनेम पासवर्ड जर तुम्ही तुमचा पॅटर...

अध्यापनात संगणकाचा वापर

सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार? संगणकाची वैशिष्ट्ये १. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे. २. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते. ३. अ...

सायबर क्राईम

कोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो. संगणक तसेच इंटरनेटच्या क्षेत्राबाबतही असाच विचार गरजेचा ठरत आहे. अलीकडे सायबर सुरक्षितता ही गंभीर तसेच चिंताजनक बाब ठरत आहे. याचे कारण संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी. गेल्या काही वर्षांत इंटरनेटद्वारे आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता आणि त्या संबंधी फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीची माहिती मिळवणे तसेच त्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे ठरत आहे.  हॅकर्स विविध उद्देशांसाठी सायबर गुन्हेगारीचा आधार घेत आहेत. त्यात मुख्यत्वे विविध बँकांमधील संबंधित खातेदाराची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि गोपनीय माहिती चोरणे तसेच एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी माहितीचा वापर करणे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्यांचा समावेश होतो. अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटना शहरी भागांबरोबर निमशहरी तसेच ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अशा वेळी संग...

गुगल कसे वापरावे

गुगल हे एक सर्च इंजिन आहे. म्हणजे इंटरनेटवरील असे संकेतस्थळ की ज्यावर आपल्याला हवी असलेली माहिती कुठे मिळेल याच्या लिंक्स उपलब्ध होतात. गुगलच्या होम पेजवर आपल्याला लिहिण्यासाठी एक जागा असते. त्यात आपल्याला हवी असलेली माहिती संक्षिप्त स्वरूपात टाकून एन्टर दाबले अथवा त्याच्या बाजूला असलेल्या ‘सर्च आयकॉन’वर क्लिक केले की आपल्याला हव्या असलेल्या माहितीचे स्त्रोत खाली दिसू लागतात. हे स्त्रोत म्हणजे आपल्याला हवी असलेली माहिती ज्या संकेतस्थळाच्या ज्यापानावर असेल त्याचा इंटरनेटवरील अचूक पत्ता असतो. पुढे त्या पत्त्यावर जाऊन आपण हवी असलेली माहिती मिळवू शकतो. आपल्याला हवी असलेली माहिती एखादी फाईल, फोटो, व्हीडीओ अथवा ऑडीओ क्लिप असली तरीही मिळविता येते.

इमेल कसा वापरावा

इंटरनेटवरील याहू, रेडिफ, जीमेल अशी अनेक संकेतस्थळे ‘इमेल’ सेवा पुरवीत असतात. इमेलवरून आपण एखादी माहिती सहज मिळवू अथवा पाठवू शकतो. बरेच लोक ह्या संकेतस्थळांवर आपले इमेल अकाउंट तर बनवतात मात्र त्याचा वापर करता येत नाही. संकेतस्थळावर निर्देश केलेल्या ठिकाणी आपला अचूक युजर आय.डी. आणि पास वर्ड टाकल्यानंतर आपले अकाउंट ओपन होते. त्यात मोबाईलच्या मेसेज बॉक्स मध्ये असतात तसे इनबॉक्स, आउटबॉक्स, आपण बघू शकतो. इनबॉक्स मध्ये आपल्याला आलेले इमेल, आउटबॉक्स मध्ये आपण पाठविलेले इमेल्स असतात. त्याव्यतिरिक्त राईट मेल अथवा कंपोज मेल असा एक ऑप्शन असतो, त्यात जाऊन आपल्याला ज्या पत्त्यावर म्हणजेच इमेल आयडीवर इमेल पाठवायचा आहे तो अचूक पत्ता टाकून, त्याला समर्पक शीर्षक म्हणजे सबजेक्ट द्यावे. नंतर खाली चौकटीत दिलेल्या जागी मजकूर लिहावा. इमेलसोबत एखादी फाईल अथवा फोटो पाठविण्याचीही व्यवस्था असते. सर्व गोष्टी अचूकपणे भरल्यानंतर ‘सेंट’च्या ऑप्शनवर क्लिक केली की इमेल तत्काळ पाठविला जातो. तसा मेसेजही डिस्प्ले होतो. पाठविलेला इमेल ‘सेंट आयटम्स’मध्ये दिसला की इमेल पोहोचला असे समजण्यात येते. इमेल सेवेचे ...

दूरसंचार आणि आपण..

दूरसंचार आणि आपण … .. दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मानवाने आपल्या विकासात एक पाउल आणखी पुढे टाकलेले आहे. ही क्रांती कामाचा वेग वाढविण्यासाठी तसेच एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी त्वरीत संपर्क होण्यासाठी महत्वाचा दुवा ठरली आहे. साधारणतः २०-२५ वर्षांपूर्वी दूरध्वनी केवळ उच्चभ्रू लोकांकडे, अथवा व्यापारी प्रतिष्ठाने किंवा आस्थापना इथेच आढळत. मात्र आता सामान्यातल्या सामान्य व्यक्तीकडे देखील भ्रमणध्वनीसंच असल्याचे आढळून येते. याचे कारण, पूर्वीच्या कॉलरेटपेक्षा आत्ताचे कॉलरेट कित्येक पटींनी स्वस्त झाल्याचे आढळून येते. परिणामतः सर्वसामान्य व्याक्तीलादेखील दूरध्वनी बाळगणे शक्य झालेले आहे. पूर्वी एखादया व्यक्तीला दुसऱ्याशी संपर्क साधण्याकरीता पत्रव्यवहारासारख्या वेळखाऊ साधनाचा आधार घ्यावा लागे किंवा त्याव्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्यावी लागे जी एक खर्चिक बाबदेखील होती. मात्र, आता दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीच्या ...

ऑनलाइन शॉपिंग

इन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशनच्या या जमान्यात टेक्नॉलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आला आहे. स्वस्तातले स्मार्ट फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्टस ऑनलाइन बघू शकते. यात अगदी शूजपासून, टी शर्ट, मोबाइल, म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप व विविध इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचाही समावेश आहे. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा पैशाचा व वेळेचा अपव्यय यामुळे टळू शकतो. ऑनलाइन रिटेलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. ऑनलाइन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते ते आता जवळ आले आहे. ऑनलाइन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. तसेच जे प्रॉडक्ट आपल्या गावात किंवा शहरात मिळत नाही, त्या प्रॉडक्टचीही खरेदी करणे यामुळे शक्य होते.वेबसाइटमुळे आपण केव्हाही (अगदी रात्रीही) ऑनलाइन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहे किंवा जे लोक आपले घर सोडू शकत नाही अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इं...

इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य

इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे. आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच महत्व प्राप्त झालेले आहे. म्ह्णूनच तर येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी फेसबुकचा मतदारांपर्यत पोहचण्यासाठी माध्यम म्ह्णून वापर करायला सुरूवातही केली आहे. फक्त मरठी साहित्याच्या दृष्टीने फेसबुकडे पाहिले असता असे लक्षात येते की पूवी फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी मराठी साहित्यिक इंग्रजीचा वापर करायचे, नंतर ते मराठी इंग्रजीतून लिहू लागले आणि आता मराठी साहित्यिक पूर्णपणे मराठीत...

युनिकोड म्हणजे काय?

प्रस्तावना युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड मानक व आयएसओ १०६४६ मानकाची एक विस्तारित यंत्रणा आहे जिला यूटीएफ-१६ म्हणतात ज्यामध्ये जवळपास दहा लाख कॅरेक्टर्सचे एनकोडिंग करता येते. आपला संगणक युनिकोड / भारतीय भाषा समर्थीत कसा करावा ? विंडोज एक्सपी ऑपरेटिंग साठी इथे  क्लिक करा विंडोज ७ ऑपरेटिंग साठी इथे  क्लिक करा इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII)म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII) हे मानक, सर्व संगणकांमध्ये आणि संवाद माध्यमांमध्ये वापरण्यासाठी तयार केले आहे.यामध्ये ७ किंवा ८ बिट कॅरेक्टरच्या वापराला परवागनगी आहे.८ बिट वातावरणात, खालील १२८ कॅरेक्टर्स माहितीच्या देवाणघेवाणीसाठी निश्चित केलेल्या आय...

भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास

भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास माणसा माणसांत अनेक पद्धतीने संपर्क साधला जातो त्यामधे द्क् आणि श्वाव्य पद्धती सर्वोच्च स्थानावर आहे. सध्या माणूस व मशीन यांच्या दरम्यानचा संपर्क माणसाच्या सोयीपेक्षा मशीनच्या सोयीवर अधिक अवलंबून आहे. माऊस तसेच कीबोर्ड मुख्य इनपुट सांकेतिक भाषा आहे तसेच व्हिज्युअल प्रदर्शन युनिट मुख्य आऊटपुट सांकेतिक भाषा आहे. अशा प्रकारच्या इंटरफेसच्या वापरासाठी खास कौशल्याची तसेच मानसिक अभिवृत्तीची आवश्यकता असते, जे अनेकांकडे नसते. म्हणून परस्पर्रांमध्ये संपर्क प्रस्थापित करणाऱ्या या मशीन केंद्रीत मोडचे मानव-केंद्रित इंटरफेसमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर सामर्थ्याचा सगळयांनाच लाभ मिळेल. खरं म्हणजे माहिती कळण्यासाठी ती डोळयासमीर प्रत्यक्ष दिसल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो, परंतू माहिती प्रत्यक्ष वाणीवाटे सांगण्याला सर्वाधिक प्राधन्य दिलं जातं आणि ते सोपही असतं. कॉम्प्युटर आणि दूरसंदेश दळणवळण प्रणाली एकत्रित येण्यामुळे शाब्दिक दळणवळण आज अधिक प्रभावी ठरलं आहे, ज्यामुळे लोकांना, दूरवर असलेल्या कॉम्प्युटर वरून माहिती सहजपणे ...

आय.टी त साक्षरता

आय.टी त साक्षरता या वेबपोर्टलचा आयटी साक्षरता विभाग खालील बाबींविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व संगणक, हार्डवेअरविषयी मूलभूत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याशिवाय यासंबंधी अनेकदा विचारल्या जाणा-या प्रश्नांची उत्तरेही येथे निवडक प्रादेशिक भाषांत दिलेली आहेत. फोनेटिक कीबोर्ड वापरून भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये टाईप करणे संगणकावर प्रादेशिक भाषा टाईप करणे ही सामान्य माणसासाठी फारच आकर्षणाची गोष्ट आहे. क्विलपॅड (Quillpad) व लिपिकार (lipikaar) ही मोफत उपलब्ध असणारी ऑनलाईन टाईपिंग टूल्स (साधने) वापरून भारतीय भाषांमध्ये टाईप करता येतात. ही साधने ट्रान्सलिटरेशन टेक्नॉलॉजी वापरतात त्यामुळे आपण एखादा शब्द जसाच्या तसा इंग्लिशमध्ये टाईप करू शकतो. उदा. राष्ट्रभाषा हा शब्द टाईप करण्यासाठी 'rAShTrbhAShA असे न लिहिता 'rashtrbhasha' असे लिहिले तरी चालू शकते. टाईप करण्यासाठी पान उघडल्यावर आपल्याला हवी ती भाषा निवडून आपण टाईप करू शकतो. ही साधने खालील ठिकाणी उपलब्ध आहेत http://quillpad.com/ http://www.lipikaar.com/ फॉन्ट...