Fast, SEO Friendly Wordpress Theme. Easy Setup And Great Support. Used On Over 200k Sites. Please Do Not Purchase Using Your Own Affiliate Link, Contact Support. BUY NOW
काही दिवसांपुर्वी मी changelog podcast वर डाॅक्टर कोरी डाॅक्टरोव हयांची मुलाखत एेकली. मुलाखत open source software चा इतिहास आणि भविष्य ह्याबद्दल आहे. त्या पैकी दोन गोष्टींविषयी मी टेक मराठीच्या वाचकांना माहिती करून देऊ इच्छीतो. कोरी डाॅक्टरोव हे विज्ञानकथा लेखक आहेत. त्याशिवाय ते Electronic Frontier Foundation (EFF) च्या युरोप विभागाचे माजी संचालक होते (ते अजूनही EFF चे काम करतात) “DRM अर्थात Digital Rights Management ला संपवणे” हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे ते ह्या मुलाखतीत म्हणतात. प्रथम आपण DRM काय आहे ते समजावून घेऊ. DRM चा वापर करून, उत्पादक तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूच्या वापरावर निर्बंध घालू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही विकत घेतलेली गाण्याची CD तुम्ही इतरांना नक्कल (copy) करून देऊ शकत नाही कारण त्यामुळे एका CDची विक्री कमी होऊन उत्पादकाचे नुकसान होते (अशी मूळ कल्पना होती). मूळ कल्पना piracy ला आळा घालणे अशी होती, परंतु त्याचा गैरवापर होऊ लागला आधी संगीत आणि e-booksसाठी असलेली DRM ची संकल्पना आता light bulbs, John D...