Skip to main content

Best Selling Wordpress Theme, Socrates (view mobile)

Fast, SEO Friendly Wordpress Theme. Easy Setup And Great Support. Used On Over 200k Sites. Please Do Not Purchase Using Your Own Affiliate Link, Contact Support. BUY NOW

छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. घरोघरी ब्रॉडबँड पोहोचल्यावर आणि मोबाईलवर इंटरनेटसेवा सुरू झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढणार आहे. त्यांच्यावर बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.
आपण आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकाल. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्युअल छापण्यास व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास बराच खर्च येतो. ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर टेवल्यास कोणासही व कोठेही पाहता येते वा छापून घेता येते. यामुळे छपाईचा वा पोस्टेजचा खर्च वाचतो. याशिवाय वेबसाईटवर फोटो, ध्वनी वा चित्रफिती अथवा संदर्भ साहित्य ठेवता येत असल्याने ग्राहकास उद्योग, उत्पादन व सेवा यांचे प्रत्यक्ष भेटीसारखे सर्वार्थाने ज्ञान होऊ शकते.
वेबसाईटवरूनच संपर्क साधण्याची व अधिक माहिती, शंका वा मागणी नोंदविण्याची सोय असल्याने ग्राहकास ते फार सोयीचे ठरते. क्रेडिट कार्डसारखी व्यवस्था असल्यास वेबसाईटवरूनच जागतिक स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. इंजिनिअरिंग वा बांधकामविषयक उद्योगात मोठी ड्नॅइंग पाठवावी लागतात. नेहमीच्या इमेलने ती पाठविता येत नाहीत. साध्या वेबसाईटवरूनही ती लवकर घेता येत नाहीत. अशावेळी वेबसाईटवर आवश्यक तेवढी जागा राखून ठेवून व एफटीपी प्रणालीचा वापर करून ही गोष्ट साधता येते.

Comments

Popular posts from this blog

Online Information Technology Bachelor’s Degree

Online IT Degree: An Overview Information technology refers to computing systems used to collect, record, organize and access data. Many career paths are available in this broad field. Some professionals specialize in developing computerized databases, networks and other programs; these individuals are known as architects. Other IT professionals serve as the administrators for these programs. Additional job titles include software and web developers, computer programmers, systems analysts and computer support specialists. High salaries, low unemployment rates and the possibility of working from home are some of the biggest draws for these careers. Due to the widespread use of computer technology – and the growing complexity of data-storing systems – IT professionals are found in virtually every industry. According to the Cyberstates 2016 survey published by CompTia, there are roughly 6.7 million people employed in...

वास्तववादी तंत्रज्ञान

अ‍ॅपलप्रेमींसाठी सप्टेंबर महिना म्हणजे एक पर्वणीच असते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अ‍ॅपल कंपनी नवे तंत्रज्ञान जगासमोर घेऊन येते आणि तंत्रप्रेमींना अधिकाधिक मोहात पाडते. या वर्षी कंपनीचा दहावा वर्धापन दिन असणार आहे. यामुळे आपल्या ग्राहकांना काही तरी खास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कंपनी सध्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर विशेष भर देत असल्याचे मुख्याधिकारी टिम कूक यांनी सांगितले. यानंतर अर्थविषयक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आयफोन ८सोबत कंपनी ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित चष्माही बाजारात आणणार आहे. तसे पाहायला गेले तर ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हे तंत्रज्ञान तसे जुनेच, आपण अनेकदा त्याचा वापरही केला आहे किंवा करत आहोत. मात्र त्यात सातत्याने नवसंशोधन होत असल्याने प्रत्येक वेळी त्याचे नवे रूप समोर येते. अ‍ॅपलच्या मुख्याधिकाऱ्यांच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा हे तंत्रज्ञान चर्चेत आले आहे. पाहू या काय आहे हे तंत्रज्ञान. काय आहे हे तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जगभरातील स्मार्टफोनधारकांना वेड लावणारा पोकेमॉन गो हा गेम उदाहरण म्हणून घेऊ या. या गेममुळे अँग्री बर्डस, ...

Information Technology (IT)

Information technology (IT) is the use of any computers, storage, networking and other physical devices, infrastructure and processes to create, process, store, secure and exchange all forms of electronic data. Typically, IT is used in the context of enterprise operations as opposed to personal or entertainment technologies. The commercial use of IT encompasses both computer technology and telephony. The term information technology was coined by the Harvard Business Review , in order to make a distinction between purpose-built machines designed to perform a limited scope of functions and general-purpose computing machines that could be programmed for various tasks. As the IT industry evolved from the mid-20 th century, it encompassed transistors and integrated circuits -- computing capability advanced while device cost and energy consumption fell lower, a cycle that continues today when new technologies emerge.