Skip to main content

Posts

Best Selling Wordpress Theme, Socrates (view mobile)

Fast, SEO Friendly Wordpress Theme. Easy Setup And Great Support. Used On Over 200k Sites. Please Do Not Purchase Using Your Own Affiliate Link, Contact Support. BUY NOW

हे DRM(Digital Rights Management) काय आहे?

काही दिवसांपुर्वी मी changelog podcast वर डाॅक्टर कोरी डाॅक्टरोव हयांची मुलाखत एेकली. मुलाखत open source software चा इतिहास आणि  भविष्य  ह्याबद्दल आहे. त्या पैकी दोन गोष्टींविषयी मी टेक मराठीच्या वाचकांना माहिती करून देऊ इच्छीतो. कोरी डाॅक्टरोव हे विज्ञानकथा लेखक आहेत.  त्याशिवाय ते Electronic Frontier Foundation (EFF) च्या युरोप विभागाचे माजी संचालक होते (ते अजूनही EFF चे काम करतात) “DRM अर्थात Digital Rights Management ला संपवणे” हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे ते ह्या मुलाखतीत म्हणतात. प्रथम आपण DRM काय आहे ते समजावून घेऊ.  DRM चा वापर करून, उत्पादक तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूच्या वापरावर निर्बंध घालू शकतो.  उदाहरणार्थ, तुम्ही विकत घेतलेली गाण्याची CD तुम्ही इतरांना नक्कल (copy) करून देऊ शकत नाही कारण त्यामुळे एका CDची विक्री कमी होऊन उत्पादकाचे नुकसान होते (अशी मूळ कल्पना होती).  मूळ कल्पना piracy ला आळा घालणे अशी होती, परंतु त्याचा गैरवापर होऊ लागला आधी संगीत आणि  e-booksसाठी असलेली DRM ची संकल्पना आता light bulbs, John D...

इनोवेशन – नवीन दृष्टीकोन

inovation वेगवेगळे प्रकल्प राबवताना, product व उत्पादने विकसित करताना आपण इनोवेशन हा शब्द कित्येकदा वापरतो. सध्या राजकीय घोषणांचा मुलभूत भाग बनून राहिलेल्या व अती वापराने गुळगुळीत होत चाललेल्या या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा कधी प्रयत्न होतो तर कधी होत नाही. देशाच्या अर्थ प्रणालीत इनोवेशन नक्कीच मोठी कामगिरी बजाऊ शकेल यात कुणालाच शंका नाही. एकीकडे मोठ मोठ्या घोषणा आहेत तर दुसरीकडे भारतातून एकही जागतिक दर्ज्याची product न तयार झाल्याची खंत आहे. अशा परिस्थितीत इनोवेशनच्या माध्यमातून ही खंत दूर करता येईल का? येत्या दशकात इनोवेशनचा भारतीय औद्योगिक प्रगतीत काय रोल असेल? अशासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या लेखात आपण इनोवेशन म्हणजे काय? व त्याचा उद्योजकतेमध्ये कसा समर्पक उपयोग करता येईल  याचा मागोवा घेऊ या. इनोवेशन  संदर्भात अनेक गैरसमज आहेत. कोठलीही गोष्ट वेगळ्या रीतीने करणे याला इनोवेशन समजणारे कित्येक लोक आढळतात. नाविन्य हा इनोवेशनचा आधारभूत भाग असला तरीही फक्त नाविन्य  म्हणजे इनोवेशन नव्हे. नवीन संकल्पना अथवा  idea जी उपयुक्त असेल तिला इनोवे...

CSपाठशाळा – एक संगणकीय विचार धारा

आजकाल एका बाजूला बेरोजगारी वाढत जात असली तरी दुसऱ्या बाजूला उद्योग व व्यवसायांना उत्तम कर्मचाऱ्यांची कमतरता आढळून येत आहे. व्यावसायिकांना मुळात तार्किक , विचारी आणि परिपूर्ण कर्मचारी हवे असतात. पण ते क्वचितच मिळतात. काय ही कौशल्ये फक्त इन्जीनीयारांकडूनच अपेक्षित आहेत? अजिबात नाही! सगळ्याच प्रकारच्या व्यावसायांमध्ये ही कौशल्ये कामात येतात. पण मग ही कौशल्ये कशी व कधी शिकली व शिकवली गेली पाहिजेत? कॉलेजमध्ये हे शिकवणे योग्य ठरेल का? पूर्णपणे नाही. कारण आपण जर समाजाचा विचार केला, तर बरीच मुले कॉलेजला जातच नाहीत. गेली तरी वेग-वेगळ्या स्ट्रीम्समध्ये शिक्षण घेतात. सगळ्या स्ट्रीम्समध्ये ह्या कौशल्यांचा एक सारखा समावेश होणे शक्य नाही. पण ह्या सगळ्या कौशल्यांचे विकसन एकाच ठिकाणी होऊ शकते – शाळेमध्ये! ही कमतरता भरून काढण्यासाठी CSपाठशाळा या उपक्रमाची सुरुवात केली गेलेली आहे. ACM इंडियाच्या शैक्षणिक विभागातर्फे ही योजना राबवली गेली आहे. ACM ही संगणक वैज्ञानिक विश्वव्यापी संस्था आहे. या संस्थेतर्फे संगणकासंदर्भित अनेक संशोधनपत्र  प्रकाशित होत असतात. त्यांनी पुढाकार घेउन, सद...

बिटकॉईन

आज काल बँकेत जाणे हे फार कमी झाले आहे नाही का? पूर्वी पैसे भरायला, काढायला सगळ्या कामांसाठी बॅंकेत जावे लागत असे. पण आता मात्र क्रेडिट कार्ड ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या सुविधांनी सारे चित्रच पालटले आहे. या पुढची पायरी म्हणजे बिटकॉईन! बिटकॉईन म्हणजे नेमके काय आपण ते कसे वापरू शकतो याचा आढावा घेणारा हा लेख. बिटकॉईन म्हणजे व्हर्चुअल करन्सी किंवा डिजिटल करन्सी. साधारण ७ वर्षांपूर्वी ही संकल्पना अस्तिवात आली. कोणत्याही बॅंकेच्या शिवाय वा बँक अकाउंट शिवाय कोणत्याही माणसाला जगभरात कोठेही दुसऱ्या माणसाला बिटकॉईन  पाठवू शकतो, अशी ही संपूर्णपणे इंटरनेटवर चालणारी व्यवस्था. याला लागते इंटरनेट आणि वॉलेटचे खाते (अकाउंट). जसा ई-मेल पाठवतात तशाच प्रकारे आपण हे बिटकॉईन समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. ह्याच्याच संज्ञा पाहायच्या झाल्या तर असे म्हणता येईल की, हे एकास एक म्हणजे peer-to-peer असे नेटवर्क आहे. याला क्लायंट इंटरफेस लागतो ते म्हणजेच वॉलेट. यातील सुसूत्रतेसाठी विशेष प्रोटोकॉल तयार केले आहेत. या सर्वांवर सर्वात वरच्या थरावर असते ही डिजिटल करन्सी. आता बिटकॉईन वा...

माहिती तंत्रज्ञान, डिजीटल इंडिया, आणि ई-गव्हर्नंसचे युग

तंत्रज्ञानामुळे माणसाचे जगणे समृद्ध होत चालले आहे. भविष्यात ते अधिकाधिक समृद्ध होत जाणार आहे. साधारण आणखी 25-30 वर्षांनी कसे चित्र असेल? माहिती तंत्रज्ञानाचा आजवरचा प्रवास पाहता, भविष्यात मानव संपूर्णपणे या तंत्रज्ञानावर अवलंबून असेल असे चित्र दिसते. मानवी जीवनातील अधिकतम क्रिया-प्रक्रिया माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पार पाडल्या जातील. जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासातील सर्वच कामे या तंत्रज्ञानामार्फत केली जातील. पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर आपण रेल्वे आरक्षण, बँकिंग, पारपत्र आवेदन, मुद्रांक नोंदणी, स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी, नोकरीसाठीची आवेदने, शॉपिंग, विविध प्रकारची देयके चुकती करणे, इत्यादी कामे संगणकाद्वारे ऑनलाईन करू शकू असे त्याकाळी स्वप्नातही वाटले नव्हते. आज ही आणि तत्सम अनेक कामे सर्व वयोगटांतील नागरिकांकडून अत्यंत सहजपणे केली जात आहेत. जे कधीकाळी केवळ अकल्पित होते, ते आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. पुढे येणा-या काळात याहूनही अधिक किचकट व गुंतागुंतीची कामे माहिती तंत्रज्ञानामार्फत केली जातील....

c प्रोग्रॅमिंग, भाग-१

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकायचे म्हटले की सर्वप्रथम c प्रोग्रॅमिंग आले पाहिजे. कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर समजते त्यामुळे  मराठीत  c प्रोग्रॅमिंगविषयी लेख लिहिण्यास सुरुवात करीत आहे.सर्व प्रथम आठवण झाली ती Let us C  या पुस्तकाची. C बरोबर माझी पहिली ओळख झाली ती या पुस्तकानेच. त्याचे c   या अक्षराच्या उच्चारातून ध्वनित होणार्‍या दुसर्‍या अर्थावर आधारलेले शीर्षकच आकर्षक होते.  ‘चला पाहू या’ या नावाने ब्लॉग लिहूनच मीही c प्रोग्रॅमिंग विषयी लेखनास सुरुवात करावी असा मला मोह झाला. पण मी तो आवरला. सर्वजण आधी c प्रोग्रॅमिंग शिकतात. माझ्याबाबतीत मात्र तसे घडले नाही. आधी मी बेसिक (gwbasic) प्रोग्रॅमिंग भाषा शिकलो. ती मला इतकी सोपी वाटली की थोड्याच अवधीत मला बेसिकमध्ये कोणताही प्रोग्रॅम लिहिणे जमू लागले. मात्र असे प्रोग्रॅम चालवून त्याचे उत्तर काढण्यासाठी gwbasic ची गरज भासे. शिवाय ती interpreter पद्धतीने ( प्रत्येक वाक्यागणिक प्रक्रिया करणारी) कार्य करीत असल्याने त्या भाषेला कॉम्प्युटर प्रोग्रॅमरऎवजी वापर करणार्‍यासाठी ती योग्य होती.त्यामान...

c प्रोग्रॅमिंग भाग -२

पहिल्या भागात आपण एक प्रोग्रॅम करून पाहिला. मात्र त्यात आपण लिहिलेलेच वाक्य दाखविण्याचे कार्य होते. अधिक वाक्ये लिहिल्यास ती एकापुढे एक अशी सलग येतात. वेगवेगळ्या ओळीवर येण्यासाठी वाक्याशेवटी \n (म्हणजे न्यू लाईन) चा वापर करावा लागतो. बीजगणितात आपण चल व अचल संख्यांना नावे देऊन गणित सोडवितो, त्याप्रमाणे c प्रोग्रॅममध्येही आपल्याला संख्या ( number) वा अक्षरसमूह (string) यांना नावे देऊन गणिते सोडविता येतात. पूर्णांक संख्येसाठी int तर अपुर्णांकासाठी float यांचा वापर केला जातो. उदा. int width,height,area,perimeter याचा अर्थ वरील सर्व संख्या पूर्णांकात आहेत. तर float x,y याचा अर्थ x आणि y या अपूर्णांकातील ( दशांश चिन्हासहित) संख्या आहेत. स्कीनवर पूर्णांक दाखविण्यासाठी %d तर अपुर्णांक दाखविण्यासाठी %f ही चिन्हे वापरावी लागतात व शेवटी व्हेरिएबलचे नाव लिहावे लागते. आता वरील माहितीचा उपयोग करून तयार केलेला खालील प्रोग्रॅम लिहून उत्तर काढा. #include void main() { int width,height,area,perimeter; width=20; height=30; area=width*height; perimeter= 2*(width+heigh...